अहमदाबाद मर्कंटाईल बँकेची ६० वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

मजबूत आर्थिक स्थितीचे उमटले प्रतिबिंब
अहमदाबाद मर्कंटाईल को-ऑप बँकेची वार्षिक सभा उत्साहात
अहमदाबाद मर्कंटाईल को-ऑप बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष श्री. शरदभाई पी. शाह.अहमदाबाद मर्कंटाईल को-ऑप बँक
Published on

गुजरातस्थित अहमदाबाद मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेची (मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक) ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अहमदाबाद येथे सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. प्रारंभी बँकेचा २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अहवाल सभासदांसमोर सादर करताना अध्यक्ष श्री. शरदभाई पी. शहा म्हणाले की, बँकेच्या ठेवी २,७६८ कोटी तर कर्जवाटप १,६८१ कोटी इतके झाले असून, यावर्षी एकूण व्यवसाय ४,४४९ कोटींच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. याच वर्षात बँकेने मेहसाणा येथे FSWM दर्जा अंतर्गत आपली ३५ वी शाखा सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे, बँकेस सलग दुसऱ्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून FSWM (Financially Sound and Well Managed) दर्जा प्राप्त झालेला आहे.

बँकेचा ढोबळ NPA ३४.११ कोटींवरून कमी होऊन आता केवळ १०.३० कोटींवर आला असून, NPA साठी केलेली तरतूद १०९ कोटी आहे. त्यामुळे नेट NPA ०% आहे, जे बँकेच्या वित्तीय शिस्तीचे प्रतीक आहे. सध्याचे एकूण राखीव निधी ७५२ कोटींवर पोहोचले असून, हे बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी बँकेने १२% लाभांश जाहीर केला असून, सभासदांना भेटवस्तू म्हणून चांदीचे नाणेसुद्धा देण्यात येणार आहे.

Banco News
www.banco.news