

बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. State Bank of India (SBI) ने 2026 साठी एकूण 2273 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 25 फेब्रुवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत SBI भरती पोर्टलवरून अर्ज करायचा आहे.
या भरतीद्वारे देशभरातील 16 सर्कल्समध्ये पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात एकूण 194 पदे असून, त्यातील मुंबई मेट्रो सर्कल (मुंबई व गोवा) मध्ये 143 पदे रिक्त आहेत.
याशिवाय अहमदाबाद सर्कलमध्ये 200, बंगळुरूमध्ये 300, भोपाळमध्ये 150, चंदीगडमध्ये 250, चेन्नईमध्ये 200, उत्तर-पूर्व सर्कलमध्ये 175, हैदराबादमध्ये 50, जयपूरमध्ये 100, कोलकातामध्ये 200, लखनऊमध्ये 50 आणि नवी दिल्लीमध्ये 70 पदे भरली जाणार आहेत. अशा प्रकारे देशभरातील विविध सर्कल्समध्ये ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. मेडिकल, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट (CA) अशा पदवीधारकांनाही संधी आहे.
अनुभव:
31 डिसेंबर 2025 पर्यंत, कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत (RRB) अधिकारी म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे (31 डिसेंबर 2025 रोजी). सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
भाषा:
ज्या सर्कलसाठी अर्ज करणार आहेत, त्या भागाची स्थानिक भाषा येणे अनिवार्य आहे. (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी)
उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल.
प्रथम मार्च 2026 मध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा (Objective + Descriptive) होईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी (Screening) केली जाईल. पुढील टप्प्यात मुलाखत आणि शेवटी स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल.
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गासाठी ₹750 अर्ज शुल्क आहे.
अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा:
SBI Recruitment 2026 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याची संधी दवडू नका. पात्रता पूर्ण होत असल्यास आजच अर्ज करा.