RBI Assistant Recruitment 2026: 650 पदांसाठी मोठी भरती

देशाच्या मध्यवर्ती बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांद्वारे रिझर्व्ह बँकेमध्ये सहाय्यक म्हणून करिअर सुरू करण्याची मोठी संधी तरुणांसाठी उपलब्ध झाली आहे.
RBI Assistant Recruitment 2026
रिझर्व्ह बँकेमध्ये सहाय्यक म्हणून करिअर सुरू करण्याची मोठी संधी
Published on

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Reserve Bank of India (RBI) ने आपल्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये सहायक (Assistant) पदांच्या 650 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत होणाऱ्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षांद्वारे तसेच भाषा दक्षता चाचणीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 पासून 8 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची तारीख:
    16 फेब्रुवारी 2026 ते 08 मार्च 2026

  • ऑनलाईन प्राथमिक परीक्षा (अनंतिम):
    11 एप्रिल 2026

  • ऑनलाईन मुख्य परीक्षा (अनंतिम):
    07 जून 2026

संपूर्ण जाहिरात कुठे मिळेल?

रिझर्व्ह बँकेचा सविस्तर अधिकृत नोटिफिकेशन फेब्रुवारी 2026 च्या तिसऱ्या आठवड्यात खालील ठिकाणी उपलब्ध होईल:

  • रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाइट - www.rbi.org.in

  • Employment News / Rozgar Samachar

रिझर्व्ह बँकेने उमेदवारांना विशेष इशाराही दिला आहे की, पैसे देण्याचे आमिष दाखवणाऱ्या ई-मेल, एसएमएस किंवा फोन कॉल्सपासून सावध राहावे. रिझर्व्ह बँक अशा कोणत्याही माध्यमातून भरतीसंदर्भात संपर्क करत नाही.

ही भरती केवळ एक नोकरी नसून, देशाच्या मध्यवर्ती बँकेत काम करण्याची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी.

RBI Assistant Recruitment 2026 – तुमच्या करिअरची सुवर्णसंधी!

Banco News
www.banco.news