युवा वकिलांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात (एनसीडीसी) नोकरीची संधी

व्यावसायिक युवांकडून (कायदा ) पदांसाठी मागवले अर्ज
एनसीडीसी युवा व्यावसायिक युवांकडून  (कायदा) पदांसाठी अर्ज मागवत आहे
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात (एनसीडीसी) नोकरीची संधी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ
Published on

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) व्यावसायिक युवा (कायदा) या पदांसाठी खालील प्रमाणे पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या जागा कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या असून नवी दिल्ली आणि पुणे येथील एनसीडीसी कार्यालयांमध्ये प्रत्येकी एकअशी दोन पदे भरावयाची आहेत.

शैक्षणिक पात्रता व अनुभव - अर्जदारांकडे एलएल. बी पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांनी बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजीकरण, खटले, SARFAESI बाबी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये, शक्यतो बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये, किमान दोन वर्षांचा पदव्युत्तर अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान आणि कायदेशीर सॉफ्टवेअरची ओळख असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा- कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.

वेतन- निवडलेल्या उमेदवारांना अनुभव आणि पात्रतेनुसार ३०,००० ते ७०,००० रुपयांपर्यंत एकत्रित मासिक मानधन मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

Banco News
www.banco.news