गोरेश्वर पतसंस्थेत 'नोकरीची सुवर्णसंधी'; विविध पदांसाठी मोठी भरती

जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
गोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, गोरेगाव
गोरेश्वर पतसंस्थेत 'नोकरीची सुवर्णसंधी'; विविध पदांसाठी मोठी भरती
Published on

गोरेगाव: सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, गोरेगाव येथे विविध रिक्त पदांसाठी तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संस्थेच्या एकूण १४ शाखांच्या विस्तारासाठी आणि कामकाजासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे:

१) ब्रांच मॅनेजर (३ पदे): कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून, बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

२) लिपिक (६ पदे): या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक ज्ञान आणि कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य मिळेल.

३) संगणक लिपिक (२ पदे): संगणक शाखेतील पदवी (BCS/BCA इ.) अनिवार्य असून सॉफ्टवेअर ऑपरेटिंगचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

४) लिपिक/चालक (१ पद): उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असून, किमान ५ वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले सविस्तर अर्ज संस्थेच्या नजीकच्या शाखेत १ मे २०२६ पूर्वी स्वतः जाऊन जमा करावेत. उमेदवारांना आपले अर्ज goreshwar1996@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या शाखांसाठी होणार भरती:

गोरेगाव, पाडळी तर्फे कान्हूर, भाळवणी, ढवळपूरी, दैठणे गुंजाळ, सुपा, पारनेर, पळवे, राळेगण थेरपाळ, जवळा, निघोज, वडझिरे, टाकळी ढोकेश्वर आणि कर्जूले हर्या या शाखांच्या कार्यक्षेत्रासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीस येताना उमेदवारांनी गोरेश्वर पतसंस्थेच्या कामकाजाविषयी आणि पार्श्वभूमीविषयी प्राथमिक माहिती घेऊन येणे आवश्यक असल्याचे संस्थेमार्फत कळवण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news