

तुमच्या मोबाइलवर अचानक एक नोटिफिकेशन येते – “₹1,000 क्रेडिट झाले” पैसे पाहून तुम्ही आनंदात बँक किंवा UPI अॅप उघडता, PIN टाकता आणि… फक्त 10 सेकंदात तुमचं संपूर्ण बँक खाते रिकामं!
धक्का बसला ना?
हा कुठलाही चित्रपटातील सीन नसून, देशभर झपाट्याने पसरत असलेला ‘जाम डिपॉझिट स्कॅम’ आहे.
सायबर गुन्हेगार अतिशय हुशारीने हा फसवणुकीचा प्रकार राबवत आहेत.
स्कॅमर आधी तुमच्या खात्यात ₹500 ते ₹2,000 रक्कम ट्रान्सफर करतो.
तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येते – Money Credited
तुम्ही विचार करता – “हे पैसे कुणी पाठवले?”
पैसे पाहण्यासाठी तुम्ही बँक किंवा UPI अॅप उघडता.
PIN टाकताच खरा खेळ सुरू होतो…
खरं तर स्कॅमरने आधीच तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी (withdraw/collect request) रिक्वेस्ट पाठवलेली असते.
तुम्हाला वाटतं तुम्ही बॅलन्स चेक करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्या रिक्वेस्टला अप्रूव्ह करता.परिणामी, क्षणात संपूर्ण खाते रिकामं होतं.
कोणताही OTP लागत नाही
तुमच्याच PIN ने व्यवहार होतो
बँक अॅप खरे असल्यामुळे संशय येत नाही
ज्येष्ठ नागरिक आणि नवखे युजर्स सहज फसतात
जर कुणी ओळखीचा नसलेला व्यक्ती पैसे पाठवत असेल, तर:
किमान 15–20 मिनिटे थांबा
स्कॅमरची विड्रॉल रिक्वेस्ट काही वेळात आपोआप एक्सपायर होते
अॅप उघडल्यावर जाणूनबुजून चुकीचा PIN टाका
त्यामुळे स्कॅमरची रिक्वेस्ट कॅन्सल होईल
नंतर योग्य PIN टाकून सुरक्षितपणे बॅलन्स तपासा
जर संशयास्पद व्यवहार झाला असेल तर:
www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर त्वरित तक्रार करा
जितक्या लवकर तक्रार, तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त
आपल्या पालकांना, आजी-आजोबांना
घरातील ज्येष्ठ नागरिकांना
कमी टेक-सॅव्ही लोकांना
कारण सायबर गुन्हेगार सर्वात आधी त्यांनाच लक्ष्य करतात.
‘जाम डिपॉझिट स्कॅम’ हा अतिशय चतुर आणि धोकादायक प्रकार आहे.
थोडीशी उत्सुकता आणि एक चुकीचा क्लिक तुमची आयुष्यभराची बचत हिरावून घेऊ शकतो.
लक्षात ठेवा: अनोळखी पैसे = तात्काळ अॅप उघडू नकाPIN टाकण्याआधी दोनदा विचार करा
जागरूक रहा, सुरक्षित रहा!