बँकिंग : जगातील घडामोडींचे परिणाम

- श्री. विक्रम अवसरीकर, पुणे
बँकिंग : जगातील घडामोडींचे परिणाम
बँकिंग : जगातील घडामोडींचे परिणाम बँकिंग : जगातील घडामोडींचे परिणाम
Published on

इतिहास पाहता युद्ध आणि बँकिंग यांचे नाते अत्यंत घनिष्ठ राहिले आहे; साम्राज्यविस्तारापासून ते आधुनिक आर्थिक निर्बंधांपर्यंत बँकांनी युद्धाचे स्वरूप बदलले आहे. महायुद्धांमुळे बँकिंगला जागतिक महत्त्व मिळाले, तर आधुनिक तंत्रज्ञानाने त्याला ‘आर्थिक युद्धाचे शस्त्र’ बनवले आहे. आज लष्करी ताकदीइतकीच आर्थिक ताकदही महत्त्वाची आहे. भविष्यातील युद्धे रणांगणाऐवजी आर्थिक व्यवस्थांमध्ये लढली जाण्याची शक्यता असल्याने, भारतासारख्या उदयोन्मुख देशाने जागतिक बँकिंगमधील हे बदल समजून घेणे अत्यावश्यक आहे.

युद्ध आणि बँकिंग यांचा संबंध वरवर पाहता वेगळा वाटतो. परंतु इतिहास पाहिला तर या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अतिशय जवळून जोडलेल्या दिसतात. युद्धासाठी प्रचंड निधी लागतो आणि तो निधी उभारण्याचे काम बँका व वित्तसंस्था करतात. परिणामी युद्धे, साम्राज्यविस्तार, आर्थिक नाकेबंदी आणि जागतिक राजकारण या सर्वांमध्ये बँकिंग क्षेत्राची भूमिका निर्णायक राहिली आहे. आधुनिक जगात तर बँका केवळ आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्था राहिलेल्या नाहीत, तर त्या जागतिक सत्ता-संतुलनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. बँक युद्धाला मदत म्हणून पैसे पुरवतात. त्या पैश्यांचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी राष्ट्राला कर्जाच्या विळख्यात अडकवतात. या कर्जाच्या विळख्याचा परिणाम हा युद्धात होणार्‍या रक्तपातापेक्षा भयानक असतो. पहिल्या महायुद्धात जर्मनीवर इतके आर्थिक निर्बंध लादले गेले की त्यातूनच दुसर्‍या महायुद्धाची बीजे पेरली गेली असे म्हणता येईल...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)

Banco News
www.banco.news