

बहुतेक वेळा तो मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे, तो नैतिकतेच्या बाबतीत योग्य आहे, याबाबत त्याच्या काय कल्पना आहेत? काम करत असताना ती आपली अंगभूत कौशल्ये वापरू शकेल का? आपल्या प्रतिमेचा वापर करून तो संस्थेच्या कोणत्या विभागामध्ये चांगली कामगिरी करू शकेल? याबाबतचे प्रश्न अगदी अभावानेच विचारले जातात.
नागरी सहकारी पतसंस्था या क्षेत्रात गेली 33 वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करत असताना, खूप काही शिकायला मिळाले. अनेक मान्यवर सहकार खात्यांतील, बँकिंगमधील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले. नागरी पतसंस्थांच्या गेल्या 30-40 वर्षांपासूनच्या प्रवासाचा एक सहप्रवासी होण्याचे भाग्य मिळाले. संगणक येण्यापूर्वीची कामकाजाची, हिशोब लेखनाची पद्धती ते अगदी आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रवासापर्यंतचा अनुभव घेता आला. हे करत असताना आपल्याला जे गवसले, हाती मिळाले ते इतरांनाही द्यावे या हेतूने पतसंस्थांच्या कार्यप्रणालीबाबत, पतसंस्थांच्या अनेक विषयांवर गेली 4-5 वर्षांपासून लेखण-प्रपंच करीत आहे. परंतु पतसंस्थांतील सेवकांच्या गुणवत्ता क्षमता वाढीबाबत, त्यांच्या मनोवैज्ञानिक क्षमतेबाबत, नीतिमत्तेबाबत, मनोभूमिकेविषयी, मानसिकतेविषयी काहीतरी लिहावे ही खूप दिवसांची इच्छा होती. इंटरनेटवर युट्युबवर मनोविज्ञान, नैतिक शास्त्र, तत्त्वज्ञान (दर्शन शास्त्र) याविषयीचे लेख, व्हिडिओज यांचा धांडोळा घेत असताना डॉ. विकास दिव्यकीर्ती सर नागरी सहकारी पतसंस्था या क्षेत्रात गेली 33 वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करत असताना, खूप काही शिकायला मिळाले...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी जानेवारी २०२६ मासिक पहा.)