

मनी म्युल खात्यात खातेदार आपल्या खात्याचा वापर गुन्हेगाराला करावयास देऊन, त्याच्या गुन्ह्याचे ओझे वाहत असतो म्हणून अशा खातेदाराला मनी म्युल (ओझे वाहणारे खेचर) म्हणतात. अशा व्यवहारात खातेदारांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होऊन तुरुंगवास होऊ शकतो. उच्च जोखीम खात्यांत कॉर्पोरेट कंपनी, ट्रस्ट, शस्त्र खरेदी-विक्रीचे करणारे व्यापारी, बांधकाम क्षेत्रातील एजंट्स/ब्रोकर्स, राजकीय व्यक्तींची/संबंधित अशी खाती येतात. अशी खाती मनी लाँड्रिंग किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित असू शकतात .रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार कमी जोखीम, मध्यम जोखीम आणि उच्च जोखीम असणारे ग्राहक अशा प्रामुख्याने तीन जोखीम श्रेणी आहेत...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सप्टेंबर २०२६ मासिक पहा.)