देशात सध्या निष्क्रिय बँक खात्यांची संख्या बरीच मोठी आहे. अशा खात्याबद्दल रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या आहेत. यावर तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. अशा निष्क्रिय खात्यासंदर्भात आपल्या बँका संबंधित खातेदाराला पत्र पाठवतात. पण काहीवेळा खातेदार नमूद केलेल्या पत्त्यावर राहतच नसल्याने, ते पत्र त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. या संदर्भात जानेवारी २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेने केलेल्या सूचनेनुसार, जर एखादे पत्र खातेदारापर्यंत न पोहोचता परत आले तर बँकेने त्याची सखोल चौकशी करावी. खरोखरच खातेदार नमूद केलेल्या पत्त्यावर राहत नसल्यानेच त्याला पत्र मिळाले नाही का? हे निश्चित करावे लागेल. काही वर्षांपूर्वी आपण असे पत्र खातेदाराला पाठवल्याचे सांगत होतो. तेव्हा रिझर्व्ह बँक काही करत नव्हती. पण आता तसे होताना दिसत नाही. म्हणजेच खातेदारचा शोध लागला नाही तर तुम्ही त्याला शोधण्यासाठी नेमके काय केले? याचा पुरावा तुम्हाला ठेवावा लागणार आहे. आजपर्यंत बँकांनी असे काहीच केले नसणार, असे माझे मत आहे. (विस्तृत माहितीसाठी मार्च २०२५ मासिक वाचा.)