

पेमेंट्स व्हिजन 2028 हे केवळ तंत्रज्ञानाचे दस्तऐवज नाही. हे विश्वासाचे, सुरक्षिततेचे आणि सर्वसमावेशकतेचे धोरणात्मक वचन आहे. चेकपासून UPI पर्यंतचा प्रवास जगाने पाहिला. आता AI - संचालित, डेटा-आधारित, जागतिक स्तरावरील पेमेंट परिसंस्थेकडे भारत वाटचाल करत आहे. ‘चेक मेला नाही तो डिजिटल झाला!’ हेच या व्हिजनचे सार आहे. डिजिटल पेमेंट वापरताना सतर्क राहा, नव्या सुविधांचा लाभ घ्या आणि डिजिटल भारताच्या उभारणीत सहभागी व्हा!
मागील तीन वर्षांपासून मी पेमेंट व्हिजन बाबतीत संदर्भात ‘बँकिंग एआय आधारित बँकिंग - भविष्यातील वेध 2030’ या विषयावर शेकडो बँकिंग व पतसंस्था सेवकांना व्याख्यान देत आहे व ही संकल्पना काय असू शकते या बाबतीत विवेचन करत आहे. एक नवी दिशा आज आपण किराणा दुकानापासून ते आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत सर्वत्र मोबाइलवरून पेमेंट करतो. UPI, नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, हे सगळे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. पण या डिजिटल पेमेंट क्रांतीमागे एक दीर्घकालीन दृष्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पेमेंट्स व्हिजन! आता RBI ने डिसेंबर 2028 पर्यंतचा नवा आराखडा जाहीर केला आहे. ‘पेमेंट्स व्हिजन 2028’ ज्याचे मुख्य सूत्र आहे ‘भारताची पेमेंट सीमारेषा घडवणे.’....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी एप्रिल २०२६ मासिक पहा.)