सहकारी बँकांच्या शाश्वत विकासाचा राजमार्ग

श्री. अविनाश शिंत्रे-गुंडाळे, मुख्य संपादक, बँको
सहकारी बँकांच्या शाश्वत विकासाचा राजमार्ग
सहकारी बँकांच्या शाश्वत विकासाचा राजमार्गश्री. अविनाश शिंत्रे-गुंडाळे, मुख्य संपादक, बँको
Published on

केवळ व्यावसायिकता असणे म्हणजे यश नव्हे, पण तो यशाचा मूलभूत पाया नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सामान्य ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास दृढ होतो. बँकेची स्थिरता ही केवळ व्यावसायिकतेवर नाही, तर भांडवली क्षमता, आर्थिक परिस्थिती, नियामक वातावरण आणि संस्थात्मक संस्कृती यांवरही अवलंबून असते.

बँकिंग क्षेत्र हे कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असते आणि या क्षेत्राचा संपूर्ण डोलारा विश्वास (Trust) या एका शब्दावर उभा असतो. अलीकडच्या काळात जागतिक आणि भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठी स्थित्यंतरे येत आहेत. तंत्रज्ञानाचा वाढता वापर, रिझर्व्ह बँकेचे कडक होत जाणारे नियम आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यांमुळे बँकिंग आता केवळ ठेवी घेणे आणि कर्ज देणे इतके मर्यादित राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर, बँका व्यावसायिक पद्धतीने चालल्या पाहिजेत (Professional Management of Banks) ही संकल्पना केवळ एक आदर्श विचार न राहता, ती बँकांच्या अस्तित्त्वासाठीची एक अनिवार्य गरज बनली आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी एप्रिल २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news