

डिजिटल राईड-हेलिंग मॉडेलमधील (मोबाईल अॅपवर चालणारी टॅक्सी सेवा) वाढत्या मर्यादा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. मोठ्या प्रमाणावर भारतात विस्तार झालेल्या ओला, उबर आणि समकक्ष वाहतूक सेवा पुरवठादारांनी शहरी वाहतूक व्यवस्थेला निश्चितच नवी दिशा दिली आहे. परंतु वाढती मागणी, मोठी लोकसंख्या आणि सेवा-मक्तेदारीचा कल वाढत गेल्याने त्यातील त्रुटी आता स्पष्टपणे प्रवासी आणि वाहतूक चालकांनाही जाणवू लागल्या आहेत.
21 व्या शतकातील भारताची गतिशील व्यवस्था सध्या संक्रमणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहे. भारताची सुमारे 65% तरुणांची दैनंदिन व्यवस्था ही प्रामुख्याने वाहन व्यवस्थेशी निगडित आहे. त्या हेतूने जलद गतीने या क्षेत्रामध्ये आधुनिक बदल आपल्याला दिसून येत आहेत. जेणेकरून प्रवासी वर्गाच्या समस्या कमी होतील. वाहनांच्या झपाट्याने होणार्या प्रसारामुळे देशातील वाहतूक क्षेत्र नव्या दिशेने पुढे सरकत असले, तरी डिजिटल राईड-हेलिंग मॉडेलमधील (मोबाईल अॅपवर चालणारी टॅक्सी सेवा) वाढत्या मर्यादा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. मोठ्या प्रमाणावर भारतात विस्तार झालेल्या ओला, उबर आणि समकक्ष वाहतूक सेवा पुरवठादारांनी शहरी वाहतूक व्यवस्थेला निश्चितच नवी दिशा दिली आहे. परंतु वाढती मागणी, मोठी लोकसंख्या आणि सेवा-मक्तेदारीचा कल वाढत गेल्याने त्यातील त्रुटी आता स्पष्टपणे प्रवासी आणि वाहतूक चालकांनाही जाणवू लागल्या आहेत...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)