

NBFCs च्या आक्रमक आणि त्वरित कर्जवाटप पद्धतीमुळे त्यांची कर्जे व अग्रिमे 40.27 लाख कोटींवर पोहोचली आहेत. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना (UCBs) तुलनेत स्पर्धा जाणवते. मात्र, नागरी सहकारी बँकांचा ग्राहकाशी असणारा थेट संपर्क या त्यांच्या अंतर्निहित सामर्थ्याचा सखोल अभ्यास केल्यास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ते NBFCs च्या तीव्र स्पर्धेतही संधी निर्माण करून आपला ग्राहक टिकवू शकतात व व्यवसाय वृद्धी करून त्यावर निश्चितच मातही करू शकतात.
मागील दशकात नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांचा (NBFCs) प्रचंड वेगाने विस्तार झाला आहे. NBFCs नी उल्लेखनीय वाढ दर्शवली असून त्यांची मार्च 2023 मधील कर्ज व अग्रिम रक्कम 33,99,655 कोटींपासून वाढून मार्च 2024 मध्ये 40,27,478 कोटींपर्यंत पोहोचली आहे, जी 18.5% वाढ दर्शवते. त्याच कालावधीत नागरी सहकारी बँकांचे (UCBs) अग्रिम 3,46,903 कोटी होते. आता हे स्पष्टपणे जाणवत आहे की NBFCs नागरी सहकारी बँकांसाठी एक आव्हान बनत आहेत. ही आव्हाने समजून घेण्यासाठी, सर्वप्रथम NBFCs या संकल्पनेचा अभ्यास करावा लागेल, जेणेकरून त्यांनी नागरी सहकारी बँकांसमोर उभा केलेली आव्हाने आणि संधींचे सखोल विश्लेषण करता येईल. (पुढे जाण्यासाठी ऑगस्ट २०२५ मासिक वाचा.)