

ठेवींचा व्याजदर किती असावा, हा प्रश्न जर आपण बँकांना केला तर प्रत्येक बँकेची यामागील भूमिका वेगळी दिसून येते. पतसंस्थांप्रमाणे केवळ बाजारातील स्पर्धा हा निकष सहसा बँकांमध्ये आढळून येत नाही. सरकारी बँका किंवा व्यापारी बँका यांचे व्याजदर तर आरबीआयच्या रेपो रेटप्रमाणेच ठरवले जातात. ठेवींचे व्याजदर निश्चित केले जातात. रेपो रेट, असेट लायबिलिटी मॅनेजमेंट आणि बाजारातील कर्ज किंवा गुंतवणुकीच्या संधी.
पतसंस्थेतील ठेवींचे व्याजदर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य पतसंस्थांना नियामक मंडळाने ठेवींच्या व्याजदरासंदर्भात अधिकतम मर्यादा घालून दिलेली आहे, परंतु मल्टिस्टेट पतसंस्थांना अशी मर्यादा अद्याप तरी नाही. राज्य पतसंस्था असोत किंवा मल्टिस्टेट पतसंस्था असोत, यामध्ये ठेवींचे व्याजदर ठरवण्याच्या निश्चित अशा पद्धती क्वचितच आढळून येतात. आपल्या ठेवींचे व्याजदर किती असावेत, असा प्रश्न जर आपण पतसंस्थांना विचारला तर बहुतेक पतसंस्था हे व्याजदर बाजारातील इतर पतसंस्थांच्या तुलनेत किमान अर्धा ते एक टक्का अधिक ठेवतात. याशिवाय, ज्या स्थिरस्थावर पतसंस्था आहेत, त्या कर्जाची मागणी, चांगले कर्जदार आणि ज्या बँकेत गुंतवणूक केली जाते, त्यावरील व्याजदर यांचाही विचार करतात. अशा काही ढोबळ तत्त्वांवर ठेवींच्या व्याजदराची निश्चिती केली जाते...( संपूर्ण लेख वाचण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मासिकावर क्लिक करा )