बँक आणि तिच्या ग्राहकांमधील व्यावसायिक नाते हे कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन असते, ज्याला उच्च दर्जाच्या सेवेद्वारे जपणे आवश्यक असते. अत्यंत समर्पित, कुशल, सौजन्यशील कर्मचारी आणि आधुनिक तंत्रज्ञान हे बँकांचे खरे संपत्तीतुल्य घटक आहेत, जे येणार्या काळात कोणत्याही स्पर्धेला तोंड देऊ शकतील. संपूर्ण ग्राहक सेवा आणि काळजी यांना आता अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, ग्राहकांचा त्यावर हक्क आहे.सेवा द्या हे आधुनिक बँकिंग उद्योगाचे नैतिक ब्रीदवाय असून, तेच यशाचे गमक आहे. बँकांनी केवळ सेवा पुरवठादार या भूमिकेपुरते मर्यादित न राहता मूल्य पुरवठादार होण्यासाठी स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे.(विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)