सायबर क्राईमवर 
मात करणे शक्य आहे...

सायबर क्राईमवर मात करणे शक्य आहे...

श्री. संजय शिंत्रे-IPS, डीआयजी, महाराष्ट्र राज्य सायबर विभाग, मुंबई.
Published on

जगभरात सध्या ८०० कोटी लोक राहतात. त्यातील ६६४ कोटी लोक मोबाईलचा वापर करतात. सध्या भारतातील ११८ कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करत आहेत. यापैकी ८४ कोटी लोक इंटरनेटशी थेट जोडले गेले आहेत. जगातील सुमारे ५०० कोटीहून अधिक लोक सोशल मीडियाचा वापर करतात. भारतात हीच संख्या ५० कोटींच्या घरात आहे. यामुळे सायबर गुन्हेगारीला एकप्रकारे बळच मिळत आहे. दक्षिण-पूर्व भागातील कंबोडियासारख्या देशात अनेक स्कॅम सेंटर उभारण्यात आली आहेत. यसंदर्भात व्हिएतनाम व नेपाळचाही येथे उल्लेख करावा लागेल. या स्कॅम सेंटरकडून जगभरातील ६० देशांमधील असंख्य युवकांना निमंत्रित करण्यात येते. तेथे त्यांना सायबर गुन्हेगारीचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच आम्ही अदृश्य शत्रूला सामोरे जात आहोत. हे लोक दर वर्षाला सहा ट्रिलियन डॉलर्सची कमाई करत आहेत. हा आकडा भारताच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे.(विस्तृत माहितीसाठी  मार्च २०२५ मासिक वाचा.)

Banco News
www.banco.news