

कर्जाची जोखीम व त्वरित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी कर्ज मागणी अर्जदार क्रेडिट इन्फॉरमेशन रिपोर्ट पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार अर्थिक संस्था या भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे परवानाप्राप्त अधिकृत क्रेडिट ब्युरोला माहिती पाठवतात. क्रेडिट ब्युरो कंपनीद्वारे सदर माहितीव्दारे क्रेडिट स्कोअर कॅलक्युलेट केला जातो. सदर क्रेडिट स्कोअर कॅलक्युलेट करतेवेळी परतफेडीचा इतिहास, क्रेडिटचा प्रकार, क्रेडिट रक्कम व घेतलेल्या आर्थिक संस्था माहिती तसेच कर्ज मागणी अनुषंगाने केलेली चौकशी इ. घटकांचा विचार केला जातो
भारतीय बँकांची संघटना (IIBF), , काही प्रमुख बँका आणि आरबीआय यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 मध्ये CIBIL ची स्थापना झाली. CIBIL चे पूर्ण नाव Credit Information Bureau (India) Limited असून त्यांचे उदिष्ट हे भारतात एक केंद्रीकृत क्रेडिट माहिती प्रणाली तयार करणे, व्यक्ती व कंपन्यांच्या कर्ज व्यवहारांची अचूक नोंद ठेवणे व बँका तसेच एनबीएफसी यांना जोखमीवर आधारित कर्ज निर्णय घेण्यास मदत करणे हा आहे. त्यानुसार सन 2004 पासून CIBIL चे अधिकृतपणे काम चालू झाले. पुढे 2016 मध्ये जागतिक क्रेडिट माहिती कंपनी Trans Union ने CIBIL मधील बहुसंख्य हिस्सा विकत घेतला. यानंतर या कंपनीचे नाव Trans Union CIBIL झाले आणि या बदलामुळे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, सुधारित जोखीम मॉडेल व अधिक अचूक स्कोअरिंग प्रणाली भारतात उपलब्ध झाली..(संपूर्ण लेख वाचण्यासाठी जानेवारी २०२६ मासिक पहा.)