

थकबाकीदार व थकबाकी हा सर्वत्र भेडसावणारा प्रश्नही यातून कमी होईल, कारण आपण यापूर्वी केलेली कर्ज वितरणे उत्पादकता वाढीसाठी दिली नाहित, तर ग्राहकाची गरज, संबंध पाहून अनुत्पादक कामासाठी वरील कर्ज कारणे टाकून ती दिल्यामुळे थकीत जाऊन आपण अडचणीत आलो आहोत.आपण वितरणातील बदल स्वीकारून महिला, नवउद्योेजक यांना उदयोग उभारणीसाठी कर्ज दिली व टुर्स अॅन्ड टुरिझम या झपाटलेल्या क्षेत्रात काम करणार्यांबरोबर संपर्क केल्यास लहान लहान कर्ज मिळतील.
सहकारी पतसंस्था चळवळीने काळानुसार बदलल्यास सर्वच क्षेत्रात संधी आहेत. समस्यांचे रूपांतरण आपण संधीत करणे आवश्यक आहे.
कर्ज वितरणाबाबत : सोने तारण, गोदाम माल तारण, ऋऊ-जऊ या सुरक्षित कर्जाला ही मर्यादा आहेत. गृह कर्ज, व्यवसायिक कर्ज, व्यवसाय वाढ या पलीकडे आपण जात नाही. परंतु बदलत्या काळानुसार
नवीन कर्जाची क्षेत्रे : आपण टुर्स अॅन्ड टुरिझम, नॉलेज बेस स्टार्टअप, ग्रामीण व शेतीशी निगडित उद्योेग, टेक्नॉलॉजी बेस उद्योेग, एज्युकेशनल लोन, आरोग्यसंरक्षक हेल्थ इन्शुरन्ससाठी कर्ज, या कर्जावर फोकस केल्यास तरुण कर्जदार मिळतील, सोबतच आपल्या भागातील उद्योेग निर्मितीला मदत ही होईल...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)