

सहकारी संस्थांनी आपल्या कारभारात शिस्त आणि पारदर्शकता आणल्यास त्या स्वायत्तता मिळवू शकतात. आंतरराष्ट्रीय मानकांपासून दूर असणार्या सहकाराने कारभारात व्यावसायिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे. तसेच तरुण वर्गाला सहकाराकडे आकृष्ट करून आपल्या कर्मचार्यांत प्रामाणिकपणा रुजवला पाहिजे. भविष्यातील वाटचालीसाठी व्हिजन ठेवले पाहिजे. हे उपाय योजल्यास सहकार क्षेत्र सहकार खात्याच्या मदतीने भविष्यातील आव्हाने पेलून सक्षमपणे आपली वाटचाल सुरू ठेवील, यात शंका नाही.(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मासिकावर क्लिक करा)