सहकारी बँकांनी दिले
लाखो युवकांना रोजगार...

सहकारी बँकांनी दिले लाखो युवकांना रोजगार...

श्री. लक्ष्मी दास, अध्यक्ष, नॅफकॅब, दिल्ली
Published on

देशातील सहकारी संस्थांची व्याप्ती फार मोठी आहे. यामध्ये अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका, तसेच अनेक क्रेडिट सोसायट्यांचा समावेश होतो. यामुळेच सहकारी संस्थांचा देशातील विस्तार फार मोठा आह, असे म्हणावेसे वाटते. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांची संख्या दीड हजारांहून जास्त तर क्रेडिट सोसायटीची संख्या हजारोच्या घरात आहे. यामध्ये सारस्वत को-ऑप बँकेसारखी ८५ हजार कोटींची बँकही आहे. तसेच यामध्ये ५० ते १०० कोटी रुपयांच्या बँकांचाही समावेश आहे. सर्व सहकारी बँकांचा व्यवसाय एकत्र केल्यास ती रक्कम प्रचंड मोठी होईल. आपण केवळ ठेवींचा विचार केल्यास सर्व सहकारी बँकांमध्ये सहा लाख कोटींच्या ठेवी आहेत. यामध्ये पतसंस्थांमधील एकूण ठेवींचाही समावेश केल्यास त्या १२ लाख कोटींच्या ठेवी होतील.(विस्तृत माहितीसाठी  मार्च २०२५ मासिक वाचा.)

Banco News
www.banco.news