

पतसंस्था ठेवींचा आणि कर्जाचा व्यवहार करते. हे व्यवहार कसे करायचे याचे धोरण संचालक मंडळ ठरवीत असते आणि ते राबवून घेत असते. संचालक हे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. ते संस्थेच्या ठेवीदारांचे व सभासदांचेही विश्वस्त असतात. या घटकांच्या आर्थिक हिताची जपवणूक करणे हे संचालक मंडळाचे प्रमुख काम आहे. पतसंस्थांच्या ठेवींना सहकारी बँकांप्रमाणे ठेव विमा संरक्षण नसल्याने सभासदांनी ठेवलेल्या ठेवींची रक्कम त्यांना व्याजासह पूर्णपणे परत मिळेल, याची काळजी त्यांना घ्यावी लागते.
पतसंस्थांच्या कामकाजात तीन मुख्य घटक असतात. त्यापैकी संस्थेचे संचालक मंडळ हा एक आहे. याला कार्यकारी व्यवस्थापन मंडळ एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट असेही संबोधले जाते. पतसंस्थेचे व्यवस्थापनात या घटकाची भूमिका महत्त्वाची असते. संस्थेच्या कारभारावर विकासावर परिणाम करणारी असते. महाराष्ट्र सहकारी कायदा आणि संबंधित पतसंस्थेचे पोटनियम यांच्या आधारे दर पाच वर्षांनी सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. अशा प्रतिनिधींना संचालक म्हणतात. या मंडळावर किती संचालक कोणत्या वर्गातून, कसे निवडायचे? त्यांची रचना कशी? त्यांचे अधिकार काय? संचालक म्हणून निवडून येण्यास व राहण्यास पात्रता काय? या सार्या बाबी पोटनियमानुसार असतात...( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)