चार भिंतींच्या पलीकडील बँकिंग

श्री. गणेश रा. निमकर, पुणे
श्री. गणेश रा. निमकर, पुणे
चार भिंतींच्या पलीकडील बँकिंगश्री. गणेश रा. निमकर, पुणे
Published on

एआय-संचालित चॅटबॉट्स आणि वैयक्तिक सेवांसह बँकिंग आणखी डिजिटल आणि ग्राहक-केंद्रित होत असून, ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. या सर्वचा परिणाम म्हणजे पारंपरिक भौतिक चार भिंतींच्या आतील पारंपरिक बँकिंग युगाचा अस्त जवळ येत असून निओ आणि डिजिटल- बँकिंग युग सुरू होत आहे.

तंत्रज्ञान, प्रगती, बदलत्या ग्राहकांच्या गरजा आणि नियंत्रकाच्या आवश्यकतांमुळे बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल झाले आहेत. सन 1960 पूर्वी पारंपरिक बँकिंग होते. बँकिंग सेवा या बँकेच्या शाखा इमारतीमध्येच म्हणजेच चार भिंतीच्या आत दिल्या जात होत्या. ग्राहकाला कोणताही बँकिंग व्यवहार करण्यासाठी बँकेच्या व्यवसायाच्या वेळेतच समक्ष यावे लागत होते. सर्व व्यवहार हे रोखीनेच केले जात असत. नंतरच्या काळामध्ये व्यवहारांसाठी चेकचा वापर केला जाऊ लागला. एटीएमची ओळखची झाल्यानंतर बँकिंग व्यवहार हे व्यवसायाच्या वेळेनंतर व बँकेच्या इमारतीबाहेर होऊ लागले. एटीएमने 24/7 रोख रक्कम उपलब्ध करून देऊन आणि भौतिक शाखा भेटींची आवश्यकता कमी करून बँकिंगमध्ये क्रांती घडवून आणली...( संपूर्ण लेख वाचण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मासिकावर क्लिक करा )

Banco News
www.banco.news