सहकारी संस्थांना टिकून राहण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार अनिवार्य
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वैयक्तिक वित्तीय सेवा, स्मार्ट वॉलेट्स, व्हॉईस असिस्टंट द्वारे, बँकिंग सेवा ग्राहकांना बारा महिने चोवीस तास उपलब्ध आहे. ग्राहक आपल्या सोयीनुसार या सेवा वापरू शकतात. बँकेच्या कामकाजाची वेळ, सुट्टी याचा त्यांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होत नाही. ऑनलाइन बँकिंगमुळे ग्राहकाला कोणत्याही सेवेसाठी बँकेमध्ये जाण्याची गरज भासत नाही, त्यामुळे ग्राहकांचा मौल्यवान वेळ वाचतो. बँकांना मोठ्या जागेची गरज नसते व जास्त कर्मचारी लागत नाही. बँकांचा खर्च कमी होतो व नफ्यात वाढ होते. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी बँका व पतसंस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे ही काळाची गरज आहे. याकडे जी संस्था/ बँक दुर्लक्ष करेल त्यांच्यापुढे भविष्यात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. (विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)