राज्यातील सहकारी पतसंस्थांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश

सहकारी पतसंस्थांची विहित नमुन्यात माहिती सादर करण्यासाठी सहकार आयुक्तांचे आदेश. सोबत पीडीएफ फाईल उपलब्ध
www.banconews.com
राज्यातील सहकारी पतसंस्थांची माहिती ३१ मार्च २०२५ पर्यंत सादर करण्याचे आदेशगुगल
Published on

सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी  नियामक मंडळ कामकाजासाठी राज्यातील नागरी / ग्रामीण / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची दि.३१/०३/२०२५ अखेरची माहिती उपरोक्त विषयाकडे लक्ष वेधण्यात येत असून त्याचे अवलोकन करावे. राज्यातील नागरी / ग्रामीण / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची माहिती नियामक मंडळाचे कामकाजासाठी अत्यंत तातडीने आवश्यक आहे. तरी आपल्या जिल्हयामध्ये मुख्यालय असलेल्या (कार्यक्षेत्र विभाग / राज्य असले तरी) सर्व नागरी / ग्रामीण / पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची सोबत जोडलेल्या नमुन्यातील बिनचूक माहिती या कार्यालयास सादर करावी. आकडेवारी रुपये लाखामध्ये सादर करावी. सदर माहिती विशेष मोहिम राबवून तातडीने उपलब्ध करुन द्यावयाची असल्याने, यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सहकार विभागाचे प्रशासन व लेखापरिक्षण कार्यालयातील कर्मचारी तसेच जिल्हयातील प्रमाणित लेखापरिक्षक यांचीही मदत घेण्यात यावी. तसेच आपले कार्यालयास प्राप्त लेखापरिक्षण अहवालावरुनही माहितीची खात्री करावी. सदर माहिती MS Excel मध्ये तयार करुन दि.२८/०७/२०२५ पर्यंत या कार्यालयास commpat२०१८@gmail.com या ईमेलवर सादर करण्यात यावी. (श्रीकृष्ण वाडेकर) अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे.

Attachment
PDF
नियामक मंडळाचे कामकाजासाठी राज्यातील नागरी ग्रामीण पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची दि. ३१ ०३ २०२५ अखेरची माहिती
Preview
Banco News
www.banco.news