रिझर्व्ह बँकेकडून केवायसी अद्ययावत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

ग्रामीण व उपनगरी भागात विशेष शिबिरे आणि डिजिटल माध्यमातून प्रक्रियेचे सुलभीकरण
KYC
रिझर्व्ह बँकेकडून केवायसी अद्ययावत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना गुगल
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँका आणि विनियमित संस्थांना ग्राहकांचे केवायसी दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी सुधारित सूचना दिल्या आहेत. या नव्या सूचनांचा उद्देश ग्राहकांना अधिक सुलभ आणि सोयीची प्रक्रिया उपलब्ध करून देणे असा आहे.आरबीआयच्या या परिपत्रकानुसार, ‘केवायसी अद्ययावत आणि कालावधी नुसार नूतनीकरण’ या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या सूचना – ठळक मुद्दे

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT), स्कॉलरशिप, जनधन योजनेतील खात्यांमध्ये केवायसी प्रलंबित असून  रिझर्व्ह बँकेने निरीक्षण केले की, PMJDY, DBT/EBT योजनांच्या लाभार्थ्यांची खाती व शिष्यवृत्ती खात्यांमध्ये केवायसी अद्ययावत नसल्याचे मोठ्या प्रमाणावर आढळले आहे. यामुळे लाभधारकांना बँकिंग सेवा अडथळ्यांमधून मिळत आहेत. बिझनेस करस्पाँडन्ट (BC) चा सहभाग ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन आता BC (बिझनेस करस्पाँडन्ट) ना देखील केवायसी नूतनीकरण प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे. ग्रामीण व अर्धशहरी भागातील ग्राहकांसाठी हा निर्णय विशेष उपयुक्त ठरणार आहे.

बँकांनी विशेष केवायसी शिबिरे व मोहिमा राबवाव्यात

  • बँकांनी ग्रामीण व उपनगरांतील शाखांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करावीत.

  • ज्या शाखांमध्ये केवायसी नूतनीकरणाचे प्रमाण कमी आहे तिथे जनजागृती मोहीम राबवाव्यात.

  • झोपडपट्टी, आदिवासी भाग, ई-पेमेंट लाभार्थी यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे.

CKYCR चा प्रभावी वापर करावा

ग्राहकांची आधीपासूनची KYC माहिती CKYCR (Central KYC Registry) वर उपलब्ध असल्यास, ग्राहकाची परवानगी घेऊन तीच माहिती वापरता येईल. ग्राहकांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.

Attachment
PDF
Updation Periodic Updation of KYC – Revised Instructions
Preview

ग्राहकांसाठी सुलभ केवायसी पद्धती

 समोरा सामोर  पद्धत

  • आधार बायोमेट्रिक ई-केवायसीद्वारे खाते उघडण्याची मुभा.

  • ग्राहकाचा वर्तमान पत्ता वेगळा असल्यास स्वघोषणा ग्राह्य धरली जाईल.

नॉन-फेस टू फेस पद्धत

  • आधार OTP आधारित ई-केवायसी द्वारे खाते उघडण्याची परवानगी (विशिष्ट अटींसह).

  • अशा खात्यांवर कठोर निगराणी ठेवली जाईल आणि एका वर्षात पूर्ण ग्राहक पडताळणी आवश्यक.

व्हिडीओ केवायसी

  •         अधिकृत बँक कर्मचाऱ्याद्वारे थेट व्हिडीओ कॉलद्वारे ओळख पडताळणी.ही पद्धत पडताळणीइतकीच वैध ठरवण्यात आली आहे. केवायसी नूतनीकरणाची सुधारित प्रक्रिया

  • कोणताही बदल नसल्यास, ग्राहक स्वघोषणा देऊन केवायसी नूतनीकरण करू शकतो.

  • हे ग्राहक ईमेल, मोबाइल अ‍ॅप, एटीएम, बिझनेस करस्पाँडन्ट, पोस्ट किंवा शाखेत जाऊन करू शकतात.

  • केवायसी नूतनीकरण कोणत्याही शाखेत करता येईल.

  • आधार OTP किंवा V-CIP द्वारे देखील प्रक्रिया करता येऊ शकते.

  • CKYCR कडून प्राप्त झालेल्या अपडेट नोटिफिकेशननुसार, बँकांनी आपोआप केवायसी नोंदी अद्ययावत कराव्यात.

निष्कर्ष

आरबीआयचे हे नवे परिपत्रक हे केवळ कायदेशीर अनुपालनासाठीच नव्हे, तर ग्राहक सुविधा आणि आर्थिक समावेश वाढवण्यासाठी देखील महत्त्वाचे पाऊल आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्था यांनी ही सुधारित प्रक्रिया त्वरीत लागू करून, केवायसी नूतनीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे.

बँको न्यूज वर अशाच अर्थपूर्ण आणि महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले राहा!

Banco News
www.banco.news