यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रांगोळी स्पर्धा, भारत माता पूजन व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
यवतमाळ अर्बन को-ऑप बँक
बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे व मंचावर उपस्थित सौ. प्राचीताई बनगिनवार, डॉ. महेश सारोळकर, श्रीधर कोहरे व आनंद पांडे
Published on

यवतमाळ : यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ येथे २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी बँक कर्मचारी संघटना व संस्कार भारती, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत माता पूजन तसेच भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी प्रदर्शनाला यवतमाळकरांनी मोठ्या संख्येने भेट देत चांगला प्रतिसाद दिला

रांगोळी स्पर्धेत पर्यावरण, सामाजिक जबाबदारी व सांस्कृतिक मूल्ये या विषयांवर आधारित रांगोळ्या साकारण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे अवघ्या ५ वर्षांच्या एका चिमुकलीने सलग दोन तास रांगोळी काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे पारंपरिक कलेला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन खर्चे यांनी रांगोळी ही केवळ सजावटीची कला नसून ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. “ही परंपरा पुढील पिढीपर्यंत जपली गेली पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. महेश सारोळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पंचपरिवर्तन आणि पर्यावरण विषयक जबाबदारीवर सविस्तर प्रकाश टाकला

यानंतर रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुल संस्कृती तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारत माता आरतीने करण्यात आली

या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष अजिंदरसिंह चावला, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे, संस्कार भारतीच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्राचीताई बनगिनवार, तसेच संचालक मंडळ सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Banco News
www.banco.news