वैश्य नागरी सहकारी बँकेत सीईओ ते लिपिक पदांसाठी सुवर्णसंधी!

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या वैश्य नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी बायोडाटासह ईमेलद्वारे अर्ज पाठविण्याचे आवाहन.
Vaishya Nagari Sahakari Bank Parbhani
वैश्य नागरी सहकारी बँकेत नोकरभरती जाहीर
Published on: 

परभणी: महाराष्ट्रात आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणाऱ्या आणि सध्या १५ शाखांद्वारे यशस्वी बँकिंग सेवा पुरवत असलेल्या 'वैश्य नागरी सहकारी बँक लि., परभणी' च्या वतीने एक महत्त्वाची नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयातील विविध विभागांमध्ये, शाखा स्तरावर तसेच आगामी व्यावसायिक विस्ताराच्या दृष्टीने ही भरती प्रकिया राबविण्यात येत असून, याद्वारे विविध उच्चपदस्थ व तांत्रिक पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी निवड समितीच्या मान्यतेने ही जाहिरात प्रकाशित झाली असून, सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण व अनुभवी उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक अहर्ता:

१. उपमुख्य कार्यकारी अधिकारी(०२ जागा):: या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक असून, त्यासह MBA, JAIIB किंवा CAIIB आणि तत्सम पदवी असणे गरजेचे आहे. सहकारी बँकेच्या विविध विभागांमध्ये काम केल्याचा किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल.

२. संगणक अभियंता (०१ जागा): या पदासाठी B.E. (IT) / कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर मधील तत्सम पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन (Microsoft Certification) चा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

३. लेखापरीक्षक (०१ जागा): या पदाकरिता B.Com / M.Com / MBA / GDC&A किंवा तत्सम पदवीसह MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सहकारी बँकेत अधिकारी पदावर किमान ५ ते ७ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

४. शाखाधिकारी - पुणे / इतर शाखा (०५ जागा): कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT झालेल्या उमेदवारांसाठी हे पद आहे. GDC&A झालेले असल्यास प्राधान्य दिले जाईल. सहकारी बँकेत अधिकारी म्हणून २ ते ५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

५. लिपिक - पुणे / इतर शाखा (२० जागा): कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि संगणकाचे ज्ञान (MS-CIT) असलेल्या उमेदवारांसाठी लिपिक पदाची मोठी संधी आहे. सहकारी बँकेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.

अर्जाबाबत महत्त्वाची माहिती व अटी:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले बायोडाटासह (Bio-Data) संपूर्ण अर्ज ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत खालील ईमेल आयडीवर पाठवावेत:

  • महत्त्वाची टीप: जरी उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज पाठविला असला, तरी बँकेच्या अधिकृत पत्त्यावर शैक्षणिक पात्रतेबद्दलच्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox copies) पाठवणे किंवा सादर करणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रिया: पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. मुलाखतीकरिता कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.

नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने बँकेच्या १५ शाखांपैकी कोणत्याही शाखेत रुजू व्हावे लागेल. तसेच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

पदांमध्ये फेरबदल करणे किंवा नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीकडे राखण्यात आले आहेत.

संबंधित सहकार क्षेत्रात उत्तम भविष्याची संधी शोधत असलेल्या पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.