श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटचा दिल्लीत राष्ट्रीय गौरव; ‘२०२६’च्या पुरस्काराने सन्मान

आर्थिक प्रगती, ग्राहकांचा विश्वास आणि प्रभावी व्यवस्थापनाची नवी दिल्लीत विशेष पावती
shri siddhivinayak multistate - cooperative credit society award 2026
सीईओ राजकुमार जाधव व अरविंद गोरे यांनी स्वीकारला सन्मान
Published on: 

नवी दिल्ली : सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण आर्थिक प्रगतीची दखल घेत ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.’ या संस्थेला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित सहकार उत्कृष्टता पुरस्काराने (Excellence Awards 2026) सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजकुमार जाधव आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Add. CEO) अरविंद गोरे यांनी हा सन्मान स्वीकारला. या पुरस्कारामुळे श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

"धावणाऱ्या वाहनाला आशीर्वादाची चाके असली की, लक्षप्राप्ती लवकर होते," या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी संस्थेने केली आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास, आर्थिक शिस्त, प्रभावी व्यवस्थापन आणि आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविलेल्या सेवाभावी कार्याची ही विशेष पावती मानली जात आहे. सहकार क्षेत्रात संस्थेने केलेली ही दमदार वाटचाल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.

संस्थापक अध्यक्षांकडून सर्वांचे आभार

या गौरवपूर्ण यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की,

"संस्थेच्या या यशामध्ये प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे आहे. सर्व सभासद, संचालक मंडळातील पदाधिकारी व सदस्य, तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी वृंदाच्या एकजुटीने, सहकार्याने आणि मेहनतीनेच हा मानाचा टप्पा गाठता आला आहे. भविष्यातही सर्वांच्या साथीने संस्थेची प्रगती अशीच अखंडित सुरू राहील."

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि संस्थेवर विश्वास ठेवणारे सभासद व खातेदार यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.