

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने (SBI) नियमित आधारावर विविध विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (Specialist Cadre Officer) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय भर्ती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, इच्छुक आणि पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती मोहिमेत दोन वेगवेगळ्या जाहिरात क्रमांकांतर्गत पदे भरली जाणार आहेत:
१. जाहिरात क्र.: CRPD/SCO/२०२६-२७/२६ (नियमित पदे)
मुख्य व्यवस्थापक (उत्पादन व संशोधन-फॉरेक्स आणि रुपी डेरिहेट्टिव्ह्ज): १ जागा (श्रेणी: एसएमजीएस-IV, कमाल वय ३०.०९.२०२६ रोजी ४० वर्षांपर्यंत)
व्यवस्थापक (उत्पादन आणि संशोधन-विश्लेशक): ६ जागा (श्रेणी: एमएमजीएस-III, कमाल वय: ३६ वर्षे)
२. जाहिरात क्र.: CRPD/SCO/२०२६-२७/२७ (नियमित पदे)
डेप्युटी मॅनेजर (रिस्क स्पेशालिस्ट- Ind AS): ३ जागा (श्रेणी: एमएमजीएस-II, कमाल वय: ३५ वर्षे)
ऑनलाइन अर्ज करण्यास व शुल्क भरण्यास सुरुवात: ०२ नोव्हेंबर २०२६
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २३ नोव्हेंबर २०२६
पात्रता निकष: वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, नोकरीचे तपशील आणि शुल्काची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळ: उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी बँकेच्या (https://sbi.bank.in/web/careers/current-openings) या लिंकला भेट द्यावी.
मार्गदर्शक सूचना: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी आणि शुल्क भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
शंका किंवा अडचण असल्यास: अर्ज करताना किंवा इतर तांत्रिक बाबींमध्ये काही शंका असल्यास, उमेदवार बँकेच्या वेबसाइटवरील "CONTACT US" --->> "Post Your Query" (https://sbi.bank.in/web/careers/postyour-query) या लिंकद्वारे आपले प्रश्न विचारू शकतात.