सायबर सुरक्षा तज्ज्ञांसाठी SBI मध्ये करिअरची सुवर्णसंधी

एसबीआयमध्ये 'महाव्यवस्थापक आणि प्रमुख-सीएसटीआरए' पदासाठी भरती; ३ डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी
SBI GM and Head CSTRA Recruitment 2026 - SBI Recruitment 2026
सायबर सुरक्षा आणि टेक रिस्क अँश्युरन्स क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भारतीय स्टेट बँकेत मोठी संधी
Published on: 

मुंबई: भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) केंद्रीय भरती व पदोन्नती विभागाने निश्चित कालावधी तत्त्वावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याअंतर्गत 'महाव्यवस्थापक आणि प्रमुख-सीएसटीआरए (सायबर सुरक्षा आणि टेक रिस्क अँश्युरन्स)' या पदासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीचा जाहिरात क्रमांक CRPD/SCO/२०२६-२७/३६ असा असून, यामध्ये एकूण १ रिक्त जागा आहे. अर्जदाराचे कमाल वय ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ५० वर्षे असणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे:

  • पदाचे नाव: महाव्यवस्थापक आणि प्रमुख-सीएसटीआरए (सायबर सुरक्षा आणि टेक रिस्क अँश्युरन्स)

  • रिक्त पदे: १

  • कमाल वयोमर्यादा (३१.१०.२०२६ पर्यंत): ५० वर्षे

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी: १९ नोव्हेंबर २०२६ ते ३ डिसेंबर २०२६

पात्रता निकष (वय, अनुभव, नोकरीचे तपशील इ.), रिक्त पदांचा सविस्तर तपशील आणि आवश्यक शुल्क याबाबतची संपूर्ण माहिती बँकेच्या https://sbi.bank.in/web/careers/current-openings या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज आणि शुल्क भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून स्वतःची पात्रता तपासून घ्यावी, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास उमेदवार बँकेच्या https://sbi.bank.in/web/careers/post-your-query या वेबसाईटवरील "CONTACT US" → "Post Your Query" या लिंकद्वारे आपली विचारणा नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी मुंबई येथील कॉर्पोरेट सेंटरच्या ०२२-२२८२०४२७ या दूरध्वनी क्रमांकाचाही उल्लेख करण्यात आला आहे.