OTC डेरिव्हेटिव्ह नोव्हेशनवर रिझर्व्ह बँकेचे अंतिम निर्देश

रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्देशांनुसार 22 सप्टेंबर 2026 पासून होणाऱ्या OTC डेरिव्हेटिव्ह नोव्हेशनवर नियम लागू; CCP आणि Market Makerच्या भूमिकेबाबत स्पष्टता.
RBI/2026-27/263, FMRD.DIRD.No.04/14.03.066/2026-27
RBI/2026-27/263, FMRD.DIRD.No.04/14.03.066/2026-27
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) OTC (Over-the-Counter) Derivative Contracts च्या Novation संदर्भातील अंतिम निर्देश जारी केले आहेत. RBI ने 22 सप्टेंबर 2026 रोजी RBI/2026-27/263, FMRD.DIRD.No.04/14.03.066/2026-27 या परिपत्रकाद्वारे हे निर्देश जारी केले.

रिझर्व्ह बँकेने OTC डेरिव्हेटिव्ह करारांच्या नोव्हेशनसंदर्भातील मसुदा निर्देश 9 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर प्राप्त झालेल्या अभिप्रायांचा विचार करून अंतिम सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. या सूचना OTC परकीय चलन, व्याजदर, सरकारी रोखे आणि क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करारांसाठी लागू असलेल्या संबंधित मास्टर डायरेक्शन्समध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

RBI/2026-27/263, FMRD.DIRD.No.04/14.03.066/2026-27
डेरिव्हेटिव्ह बाजार अधिक पारदर्शक होणार; रिझर्व्ह बँकेकडून UTI अनिवार्य

नोव्हेशन म्हणजे काय?

OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील विद्यमान पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाला करारात सहभागी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे Novation. नव्या करारामध्ये विद्यमान पक्ष आणि तिसरा पक्ष यांच्यात नवीन करार केला जातो

विद्यमान करारांबाबत महत्त्वाची स्पष्टता

नवीन निर्देश 22 सप्टेंबर 2026 रोजी किंवा त्यानंतर करण्यात येणाऱ्या नोव्हेशनला लागू राहतील. यामध्ये निर्देश जारी झाल्याच्या दिवशी अस्तित्वात असलेल्या OTC डेरिव्हेटिव्ह करारांचे त्यानंतर केलेले नोव्हेशन तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या नवीन OTC डेरिव्हेटिव्ह करारांचे नोव्हेशन यांचा समावेश आहे.

CCP मार्फत होणाऱ्या नोव्हेशनला स्वतंत्र तरतूद

Central Counterparty (CCP) कडून OTC डेरिव्हेटिव्ह कराराच्या settlement साठी केलेल्या नोव्हेशनला हे निर्देश लागू होणार नाहीत. मात्र, CCP कडून settlement साठी स्वीकारलेल्या कराराचे त्यानंतरचे नोव्हेशन या निर्देशांनुसार करावे लागेल.

RBI/2026-27/263, FMRD.DIRD.No.04/14.03.066/2026-27
रिझर्व्ह बँकेचा परकीय चलन नियमांचा मसुदा; बँकिंग व ट्रेझरी व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल

तसेच merger, demerger किंवा amalgamation योजनेअंतर्गत होणाऱ्या नोव्हेशनसाठी 9 डिसेंबर 2013 च्या संबंधित RBI परिपत्रकानुसार प्रक्रिया सुरू राहील.

User-to-user नोव्हेशनला परवानगी नाही

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील किमान एका पक्षाची भूमिका Market Maker किंवा RBI कडून अधिकृत Central Counterparty यापैकी एकाची असणे आवश्यक आहे. त्यामुळे transferor आणि transferee हे दोन्ही ‘users’ असलेल्या नोव्हेशनला परवानगी देण्यात आलेली नाही.

Market Maker किंवा CCP ‘Remaining Party’ असू शकतो

नोव्हेशननंतर करारात कायम राहणाऱ्या पक्षाला ‘Remaining Party’ म्हटले आहे. RBI ने या व्याख्येत बदल करून Market Maker किंवा Central Counterparty देखील Remaining Party असू शकतो, असे स्पष्ट केले आहे.

CCP ची संमती आणि प्रक्रिया

Anonymous platform वर व्यवहार होत असल्यास आणि CCP हा Remaining Party असल्यास, नोव्हेशनची प्रक्रिया संबंधित CCP ने निश्चित केलेल्या पद्धतीनुसार करावी लागेल.

Mark-to-Market रक्कम तत्काळ द्यावी लागणार

नोव्हेशनच्या दिवशी प्रचलित बाजारभावानुसार OTC डेरिव्हेटिव्ह कराराचे Mark-to-Market (MTM) मूल्य निश्चित केले जाईल. RBI ने स्पष्ट केले आहे की ही रक्कम transferor आणि transferee यांच्यात upfront, म्हणजेच तत्काळ देवाणघेवाण करावी लागेल; ती maturityपर्यंत पुढे ढकलता येणार नाही

बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्व

OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहार करणाऱ्या पात्र बाजार सहभागींसाठी नोव्हेशनची प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे. विशेषतः करारातील पक्ष बदल, CCP ची भूमिका, MTM सेटलमेंट आणि विद्यमान करारांच्या नोव्हेशनबाबत RBI ने स्पष्टता दिली आहे. अंतिम निर्देश जारी झाल्याच्या तारखेपासून होणाऱ्या नोव्हेशनवर हे नियम लागू राहतील.

Banco News
www.banco.news