

कधीपासून लागू होणार नियम?
रिझर्व्ह बँकेच्या विनियमन विभागाकडून (Department of Regulation) जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, हा बदल १६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या पंधरवड्यापासून (Fortnight) लागू केला जाईल.
सध्याच्या नियमांमध्ये काय होता बदल?
भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या कलम ४२(१) अंतर्गत, याआधी अनुसूचित बँकांना अहवाल कालावधीतील सर्व दिवशी आवश्यक सीआरआरच्या किमान ९० टक्के रक्कम दररोज राखण्याची मुभा होती, बशर्ते संपूर्ण पंधरवड्याची दैनंदिन सरासरी रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असणार नाही. मात्र, सध्याच्या आर्थिक आणि तरलता स्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने ही दैनंदिन किमान मर्यादा ९० टक्क्यांवरून थेट ९९ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम होणार?
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकांना आपल्या दैनंदिन रोख व्यवहारांमध्ये आणि निधी व्यवस्थापनात अधिक कठोर शिस्त पाळावी लागणार असून, यामुळे बँकिंग प्रणालीमधील तरलता अधिक नियंत्रणात राहण्यास मदत होईल.