लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी भरती

क्लार्क व अधिकारी पदांसाठी थेट मुलाखती; पुण्यासह 6 शहरांमध्ये नोकरीची संधी
Latur Urban Co-operative Bank Ltd
लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
Published on

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मार्फत क्लार्क व अधिकारी (Officer) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेशिवाय संधी मिळणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

बँकेकडून खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे:

  • Clerk (लिपिक)

  • Officer (अधिकारी)

तसेच खालील विशेषीकृत विभागांमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे:

  • कर्ज विभाग (Loans)

  • मार्केटिंग

  • बँकिंग ऑपरेशन्स

नोकरीची ठिकाणे

निवड झालेल्या उमेदवारांना खालील शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे:

  • पुणे

  • अहिल्यानगर

  • लोणी काळभोर

  • नाशिक

  • नागपूर

  • सांगली

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • शैक्षणिक पात्रता:
    B.Com / BBA / M.Com / MBA / CA Inter उत्तीर्ण

  • अनुभव:
    बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

थेट मुलाखतीचा तपशील

  • दिनांक: बुधवार, 21 जानेवारी 2026

  • वेळ: सकाळी 10:30 वाजल्यापासून

  • ठिकाण:
    लुल्लानगर शाखा, लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
    B-12, प्रेमदीप बिल्डिंग, लुल्लानगर, कोंढवा, पुणे – 411040

इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे

मुलाखतीस येताना खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत:

  • अद्ययावत बायोडाटा (CV)

  • पॅन कार्ड

  • आधार कार्ड

  • अलीकडील पगाराची स्लिप

कागदपत्रे पाठविण्यासाठी

उमेदवारांनी आपली कागदपत्रे खालील माध्यमांद्वारेही पाठवू शकतात:

अधिक माहितीसाठी संपर्क

  • मोबाईल: 9423251792

    Google Location

https://maps.app.goo.gl/1ZPL7h3W7WBAFP3K8

Banco News
www.banco.news