गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेत विविध पदांसाठी भरती

सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी! गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेत विविध अधिकारी पदांसाठी भरती जाहीर, अनुभवी व पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी.
The Gadhinglaj Urban Co Operative Bank Ltd.
गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँक
Published on

गडहिंग्लज (कोल्हापूर): दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँक लि., गडहिंग्लज (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील मुख्य कार्यालयासाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

बँकेचे मुख्य कार्यालय आजरा-संकेश्वर रोड, गडहिंग्लज, पिन कोड ४१६५०२ येथे असून, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ho@gadurban.com या ई-मेलवर पाठवावीत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

रिक्त पदांचा तपशील :

1. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच CAIIB/JAIB, DGC&A, CBF, CCBF किंवा समकक्ष पात्रता, बँकिंग, सहकार आणि कायदेविषयक पदवी

अनुभव व वयोमर्यादा : सहकारी बँकिंगमध्ये किमान 15 वर्षे अनुभव, वय 35 ते 60 वर्षे

पदसंख्या : 1

2. आय टी अधिकारी

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई (सी.एस ), एम.सी.ए, बी.सी.ए पदवी

अनुभव व वयोमर्यादा : सहकारी बँकिंगमध्ये किमान 5 वर्षे अनुभव, वय 30 ते 35 वर्षांपर्यंत

पदसंख्या : 1

3. आय टी क्लार्क / लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई (सी.एस ), एम.सी.ए, बी.सी.ए पदवी

अनुभव व वयोमर्यादा : सहकारी बँकिंगमध्ये किमान 5 वर्षे अनुभव, वय 25 ते 30 वर्षांपर्यंत

पदसंख्या : 2

अर्ज कसा कराल?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

  • सर्व इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रांसह व पगाराच्या अपेक्षेसह अर्ज

    ho@gadurban.com या ई-मेलवर किंवा आजरा-संकेश्वर रोड, गडहिंग्लज, पिन कोड ४१६५०२ या पत्त्यावर पाठवावा.

  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 15 फेब्रुवारी 2026.

महत्त्वाची सूचना

अर्जदारांनी सर्व अटी व पात्रता काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेतील ही भरती स्थानिक तरुणांसाठी उत्तम संधी असून, सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Banco News
www.banco.news