खात्यातून पैसे गायब झालेत? 'या' एका क्लिकवर पैसे मिळणार परत!

१९३० वर एक कॉल अन् ३० दिवसांत पैसे खात्यात: केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवीन 'MRM' मॉड्यूल काय आहे?
cyber crime money refund process -  mrm ncrp mha gov in portal
सायबर चोरट्यांनी लांबवलेले पैसे आता थेट तुमच्या खात्यात! ३० दिवसांत परतावा देणारा केंद्र सरकारचा नवा दिलासा
Published on

सायबर गुन्हेगारांनी खात्यातून चोरलेली किंवा फसवून लांबवलेली रक्कम आता नागरिकांना अवघ्या ३० दिवसांत परत मिळणे शक्य होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA) यासंदर्भात 'एमआरएम' (Money Refund Module) हे नवीन विशेष पोर्टल सुरू केले आहे. या सुविधेमुळे बँक खात्यात 'होल्ड' केलेली रक्कम मिळवण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास टळणार असून, ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आता 'एफआयआर' (FIR) किंवा न्यायालयीन आदेशाची गरज भासणार नाही.

तक्रार कशी करावी आणि रक्कम कशी मिळेल?

सायबर फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तक्रार नोंदवताच फसवणुकीची रक्कम पुढील खात्यांमध्ये वर्ग होण्यापासून रोखली जाऊन तत्काळ 'होल्ड' केली जाते. तक्रार नोंदवल्यानंतर मिळालेल्या १४ अंकी तक्रार क्रमांकाच्या आधारे तक्रारदार https://mrm-ncrp.mha.gov.in या अधिकृत लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

cyber crime money refund process -  mrm ncrp mha gov in portal
UPI पेमेंट फेल अन् पैसे कट? जाणून घ्या रिफंडचे सोपे नियम

रक्कम परताव्याचे नियम आणि अटी

  • ५०,००० रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी: तक्रारदाराला कोणतीही पोलीस एफआयआर किंवा न्यायालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तक्रारदाराने ५०० रुपयांचा बाँड पोलिसांना लिहून दिल्यानंतर, पोलीस 'बीएनएस' (BNS) कलम १०६(३) नुसार संबंधित बँकेला पत्र पाठवतील आणि बँक ३० दिवसांत रक्कम खात्यात जमा करेल.

  • ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी: जर फसवणुकीची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर परताव्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची (Court Order) प्रत अनिवार्य असेल. तपास अधिकारी संबंधित बँकेला माहिती देऊन ही प्रक्रिया पूर्ण करतील.

'MRM' पोर्टलवर अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तक्रारदाराने mrm-ncrp.mha.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर आलेला OTP टाकून लॉग-इन करावे. त्यानंतर १९३० हेल्पलाइनवरून मिळालेला १४ अंकी तक्रार क्रमांक, पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकून अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट होताच एक 'युनिक रिक्वेस्ट नंबर' जनरेट होईल, ज्याच्या मदतीने तक्रारदाराला आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Status) रोजच्या रोज ट्रॅक करता येईल.

फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधावा, जेणेकरून पैसे पुढे ट्रान्सफर होण्याआधीच होल्ड होतील. ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण आल्यास नागरिक जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन मदत घेऊ शकतात.

Banco News
www.banco.news