विठ्ठल-रखुमाई सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

अल्पावधीतच संस्थेची दोन कोटी ठेवींकडे वाटचाल
श्री विठ्ठल-रखुमाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था
श्री विठ्ठल-रखुमाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था
Published on

कोतोली (ता.पन्हाळा) येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संजीवनी कांबळे होत्या. यावेळी कांबळे म्हणाल्या, “अल्पावधीतच संस्थेने दोन कोटी रुपयांच्या ठेवींकडे वाटचाल केली असून संस्थेकडे सध्या १ कोटी ९० लाख रुपयांच्या ठेवी, १ कोटी २२ लाख कर्जवाटप, ५८ लाखांची गुंतवणूक तर दोन कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेला पहिल्याच वर्षी ७५ हजार रुपयांचा नफा झाला आहे." संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थापक बळवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था नावारूपाला आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सभेमध्ये सचिव पूनम लव्हटे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संचालिका सुनंदा पाटील, भारती यादव, उषा जाधव, सुनीता रेडेकर, सावित्री पाटील, रुपाली रेडेकर, रेखा पाटील, सविता माने, छाया रेडेकर, सावित्री पाटील, प्रवीणा खोत, शोभा पाटील यांच्यासह सभासद, पदाधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news