वसंतराव चौगुले पतसंस्थेचे १ हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट

चेअरमन अनिल पाटील : ३८ वी वार्षिक सभा उत्साहात
चेअरमन अनिल पाटील व समोर उपस्थित सभासद
चेअरमन अनिल पाटील व समोर उपस्थित सभासद
Published on

कोल्हापूर : वसंतराव चौगुले पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी चेअरमन अनिल पाटील यांनी सांगितले की, संस्थेने चालू वर्षात ७६० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केलेला असून आगामी काळात १ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

सध्या संस्थेचे आर्थिक चित्र –

  • ठेवी :३७५ कोटी

  • कर्ज : २७० कोटी

  • गुंतवणूक : ११५ कोटी

  • शेअर्स भांडवल : ५ कोटी

  • राखीव निधी : २१ कोटी

  • शाखा : २३

चेअरमन अनिल पाटील म्हणाले, “वसंतराव चौगुले यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.” सभेची सुरुवात वसंतराव चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सभासदांचा सत्कारही करण्यात आला.

विशेष सत्कार:

  • संजय शेटे – कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष व भारतीय जैन सभा चेअरमनपदी निवड.

  • संजय देसाई – पार्श्वनाथ बँकेचे संचालक व कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या संचालकपदी निवड.

  • भूषण पाटील–बिद्री साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालकपदी निवड.

  • सुजल करोशी–स्मार्ट गॅस क्लेम कंट्रोल प्रकल्पाला भारत सरकारकडून पेटंट.

  • निखिल साळुंखे–विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या लिपिकपदी निवड.

कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापित झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव:

या सभेत कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापित झाल्याबद्दल यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. “४० वर्षांपासून कोल्हापूर खंडपीठाची मागणी होती, ती १७ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते पूर्ण झाली,” असे पाटील यांनी सांगितले. सभेस सर्व संचालक, सभासद, शाखाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news