

मुंबई / दादर: सहकार क्षेत्रातील नामांकित आणि सुमारे ८० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्यवसाय असलेल्या 'स्वामी समर्थ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.' या राज्यस्तरीय पतसंस्थेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या विविध शाखांसाठी लेखनिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट प्रत्यक्ष मुलाखतींचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या आणि सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
पतसंस्थेच्या विस्तार आणि वाढत्या कामाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रमुख शाखांसाठी ही पदे भरली जाणार आहेत:
दादर
खार
ठाणे
वाशी
कल्याण
पनवेल
गुलटेकडी (पुणे)
पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Job Details & Eligibility)
1. पद (Post) - लेखनिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता (Qualification) - कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate in any stream)
अनुभव (Experience) - अनुभव असल्यास प्राधान्य दिल्यास जाईल.
2. पद (Post) - शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता (Qualification) - १२ वी उत्तीर्ण (12th Pass)
अनुभव (Experience) - अनुभव असल्यास प्राधान्य दिल्यास जाईल.
मुलाखतीची तारीख: मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ आणि बुधवार, ५ ऑगस्ट २०२६
मुलाखतीची वेळ: सकाळी ठीक १२.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण: स्वामी समर्थ को-ऑ. क्रे. सो. लि.
४०१, 'बी' विंग, अशोका कॉम्प्लेक्स,
रानडे रोड, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८.
संपर्क क्रमांक: ९८७०२५२१०९
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला व वेळी स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीस जाताना सोबत बायोडेटा (Resume/CV), शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड) व अनुभवाचे दाखले (असल्यास) या सर्व मूळ कागदपत्रांसह त्यांच्या छायांकित प्रति (Photocopies) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
संस्थेच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.