‘रवळनाथ’ आणि ‘महालक्ष्मी’ सोसायटीचा कर्मचारी मेळावा उत्साहात संपन्न

श्री रवळनाथ सोसायटी व महालक्ष्मी क्रेडिट सोसायटीच्या संयुक्त कर्मचारी मेळाव्यात मार्गदर्शन; ग्राहकाभिमुख सेवा व तणावमुक्त जीवनशैलीवर भर
Ravalnath Society Gadhinglaj latest news
संवाद, हास्य अन् योग... आनंदी जीवनासाठी वापरा अशोक देशमुखांची ‘पंचसूत्री’!
Published on

गडहिंग्लज : येथील अग्रगण्य वित्तीय संस्था श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स को-ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मचारी मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना पुण्याचे प्रसिद्ध हास्य कलाकार अशोक देशमुख यांनी "सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात समाजातील बहुतांश घटक विविध समस्या व मानसिक तणावाखाली वावरत आहेत. काही वेळा या तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याच्या दुर्दैवी घटना घडतात. हे टाळण्यासाठी आणि तणावमुक्त, आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने संवाद, हास्य, छंद, सहभाग आणि योग या पंचसूत्रीचा दैनंदिन जीवनात अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे," असा मोलाचा सल्ला दिला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ सोसायटीचे संस्थापक एम. एल. चौगुले होते. तर रवळनाथचे अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर आणि उपाध्यक्ष संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ravalnath Society Gadhinglaj latest news
‘रवळनाथ’ची निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध

क्रिकेट स्पर्धा, संगीत खुर्ची आणि गाण्यांची बहारदार मैफल!

कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामाचा ताण हलका व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी या मेळाव्यात विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे खास आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी चुरशीची क्रिकेट स्पर्धा रंगली होती. तसेच महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने ‘संगीत खुर्ची’ खेळात मोठी गंमत जंमत पाहायला मिळाली. खेळानंतर रंगलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाने मेळाव्यात कमालीची रंगत आणली; अनेक कर्मचाऱ्यांनी जुनी-नवी लोकप्रिय गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या भरगच्च कार्यक्रमानंतर अत्यंत उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात मुख्य समारंभ संपन्न झाला.

Shri Mahalakshmi Womens Co op Credit Society
Shri Mahalakshmi Womens Co op Credit Society

या मेळाव्यात बदलत्या बँकिंग क्षेत्रावर प्रकाश टाकताना संस्थेचे संचालक डॉ. दत्ता पाटील म्हणाले की,

"सध्या बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून तंत्रज्ञानातही आमूलाग्र बदल होत आहेत. अशा आव्हानात्मक काळात वित्तीय संस्थांची प्रगती टिकवून ठेवण्यासाठी सर्व स्तरांवर सर्वोत्तम सेवा देणे गरजेचे आहे. ग्राहकांना केवळ तत्पर सेवा देणे पुरेसे नसून, त्यांच्याशी आदराचा आणि विश्वासाचा सुसंवाद साधणे तितकेच महत्त्वाचे आहे."

कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. एल. चौगुले, अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर आणि सुशांत करोशे यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत संस्थात्मक वाढीमध्ये कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

या अंतर्गत मेळाव्यास संचालक महेश मजती, मीना रिंगणे, राजश्री कोले, संपदा चौगुले यांच्यासह दोन्ही संस्थांचे मुख्य अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डी. के. मायदेव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. मानद सचिव गौरी बेळगुद्री यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले, तर व्यवस्थापक अशोक सुळकुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Shree Ravalnath Co op Housing Finance Society Ltd Ajara
Shree Ravalnath Co op Housing Finance Society Ltd Ajara
Banco News
www.banco.news