

धुळे : पगारदार नोकरांच्या पतसंस्थांचे राज्य सहकारी फेडरेशन मर्या. धुळेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. जळगावचे उपनिबंधक सहकारी संस्था तथा अध्यासी अधिकारी श्री. महेशकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ५:३० वाजता निवडणूक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडून आलेल्या एकूण ११ संचालकांपैकी ७ संचालक या सभेला उपस्थित होते, तर ४ संचालक गैरहजर होते.
बिनविरोध झालेली निवड प्रक्रिया:
अध्यक्षपद: श्री. संजय वामन शेवाळे (एकमेव अर्ज). सूचक: श्री. जगदीश मुरलीधर वाघ, अनुमोदक: श्री. धनराज अभिमन पाटील.
उपाध्यक्षपद: श्री. विजय वसंतराव देसले (एकमेव अर्ज). सूचक: श्री. संजय वामन शेवाळे, अनुमोदक: श्री. प्रमोद मधुकर पाटील.
सचिवपद: श्री. जगदीश मुरलीधर वाघ (एकमेव अर्ज). सूचक: श्री. मनोज कारभारी वाघचौरे, अनुमोदक: श्री. धनराज अभिमन पाटील.
तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी श्री. महेशकुमार गायकवाड यांनी तिन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थापक अध्यक्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता:
संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या फेडरेशनशी राज्यातील सुमारे ५,८५३ पगारदार पतसंस्था जोडलेल्या आहेत. पतसंस्थांच्या अडचणी सोडवणे, संचालक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि थकबाकी कर्ज वसुलीत मदत करणे अशा विविध योजना २०१३ पासून संस्थापक अध्यक्ष इंजि. विजय हिलाल मंगळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविल्या जात आहेत.
यावेळी मावळते अध्यक्ष इंजि. विजय हिलाल मंगळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाने संस्थापक अध्यक्षांच्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानून भविष्यातही त्यांचे मार्गदर्शन व सक्रिय सहभाग कायम राहावा, अशी विनंती केली.
सभेच्या शेवटी मावळते सचिव श्री. प्रकाश गोविंद आहेर यांनी अध्यासी अधिकारी व सर्व उपस्थित संचालकांचे आभार मानले. अध्यासी अधिकाऱ्यांच्या परवानगीने निवडणूक सभा शांततेत संपन्न झाली.