
सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील महादेव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन आनंदराव धनवडे होते. यावेळी कसबा तारळे संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, सभासदांसह ठेवीदारांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे सुनियोजन यावरच आधारित रौप्यमहोत्सव यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या पतसंस्थेला अहवाल सालात १२ लाखांहून अधिक नफा झाला आहे. संस्थेने या वेळीही १५% डिव्हिडंड वाटपाची परंपरा कायम राखली आहे, असे गौरवोद्गार गोविंदराव चौगले यांनी काढले.
संचालक सुरेश सुतार यांनी स्वागत केले तर सचिव नंदकुमार चौगले यांनी अहवाल वाचन केले. यावेळी दहावी आणि आठवी परीक्षेत यश मिळवणाऱ्या निशा जोहार, विघ्नेश बोभाटे, आर्या चौगले आणि सुरभी चौगले या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सभेस व्हा. चेअरमन मालूबाई विठ्ठल चौगले, संचालक गणपती चौगले, धोंडीराम चौगले, महादेव कुंभार, दत्तात्रय चौगले, सुरेश सुतार, तानाजी गुरव, बापू गुरव, रंगराव पोवार, भिवा चौगले, साताप्पा टिपुगडे आदी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.