श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेटच्या खामसवाडी शाखेचा वर्धापनदिन संपन्न

दर्जेदार आर्थिक सेवांसोबत सामाजिक बांधिलकी जपत खामसवाडी शाखेने पूर्ण केली यशस्वी ४ वर्षे; वृक्षारोपाणातून दिला पर्यावरणपूरक संदेश
Siddhivinayak Multistate Credit Society - Khamaswadi branch anniversary
संस्थापक अध्यक्षांच्या उपस्थितीत रंगला सोहळा; 'झाडे लावा, झाडे जगवा'चा दिला संदेश.
Published on

धाराशिव / खामसवाडी: खामसवाडी व परिसरातील ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासाची आर्थिक सेवा पुरवून अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या खामसवाडी शाखेचा चौथा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी खामसवाडी शाखेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आर्थिक सेवांसोबतच सामाजिक दायित्व जपत संस्थेने या वर्धापनदिनाचे निमित्त साधून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत जिल्हा परिषद प्रशाला, खामसवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला.

या वर्धापनदिन सोहळ्याला संस्थेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये खालील पदाधिकारी समाविष्ट होते:

  • श्री. गणेश कामटे (चेअरमन, श्री सिद्धीविनायक जिल्हा पतसंस्था)

  • श्री. व्यंकटेश कोरे (उपाध्यक्ष)

  • श्री. राजकुमार जाधव (CEO, श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट)

  • श्री. अरविंद गोरे (Add. CEO)

  • श्री. रामचंद्र सारडे (CEO, जिल्हा पतसंस्था)

  • श्री. देविदास कुलकर्णी (MD)

  • श्री. बलराम कुलकर्णी व श्री. अक्षय शेळके (शाखाव्यवस्थापक)

तसेच संस्थेचे सर्व आदरणीय संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार, खातेदार आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाखेला वर्धापनदिनानिमित्त सदिच्छा भेट दिली.

संस्थेवर गाढ विश्वास ठेवून खामसवाडी शाखेसोबत जोडले गेलेले सर्व ग्राहक आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच आज शाखा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उत्तम ग्राहक सेवा आणि पारदर्शक कारभारामुळे ही शाखा परिसरातील आर्थिक विकासाचा कणा बनली आहे.

Banco News
www.banco.news