श्री सिद्धीविनायक क्रेडिट सोसायटीच्या जिजाऊ चौक शाखेचा ३ रा वर्धापन दिन संपन्न

संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेची उल्लेखनीय कामगिरी.
Maharashtra Cooperative Credit Society News
धाराशिव: श्री सिद्धीविनायक क्रेडिट सोसायटीचा जिजाऊ चौक शाखा वर्धापन दिन उत्साहात; ७.३० कोटींचा व्यवसाय टप्पा पार!
Published on

धाराशिव: श्री सिद्धीविनायक डिस्ट्रिक्ट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव संचलित जिजाऊ चौक शाखेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी (३ सप्टेंबर) अत्यंत उत्साहात आणि मांगल्यमय वातावरणात पार पडला. संस्थापक मा. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने अत्यंत कमी कालावधीत ७ कोटी ३० लाख रुपयांच्या व्यवसायाचा यशस्वी टप्पा पार करत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. गणेश कामटे, उपाध्यक्ष श्री. देविदास कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. रामचंद्र सारडे आणि परीक्षक श्री. प्रमोद खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना चेअरमन श्री. गणेश कामटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामचंद्र सारडे यांनी शाखेच्या प्रगतीचा आलेख मांडला. "ग्राहकांचा अखंड विश्वास, उत्कृष्ट सेवा आणि पारदर्शक कारभार यांच्या जोरावरच जिजाऊ चौक शाखेने अल्पवधीत ही उत्तुंग झेप घेतली आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ग्राहकांसाठी अधिक तत्पर आणि आधुनिक वित्तीय सेवा पुरवण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिवसभर जिजाऊ चौक शाखेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच खातेदारांनी भेट देऊन श्री सिद्धीविनायक परिवाराला पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.

Banco News
www.banco.news