श्री दत्त पतसंस्थेतर्फे सभासदांना १०% लाभांश जाहीर; १५ कोटींच्या ठेवीकडे वाटचाल

१५ कोटींची उलाढाल आणि डिजिटल बँकिंग सेवेसह संस्थेची दमदार कामगिरी.
Shri Datta Gramin Sahakari Pat Sanstha
श्री. दत्त ग्रा. सह. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन राहुल पाटील व मान्यवर
Published on

कोडोली : तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या श्री दत्त ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या, कोडोली या संस्थेने आर्थिक क्षेत्रात सातत्यपूर्ण घोडदौड कायम राखत १५ कोटी रुपयांच्या ठेवी व उलाढालीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन श्री. राहुल प्रकाश पाटील यांनी सभासदांसाठी १०% लाभांश जाहीर केला.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात संस्थेने २६.७१ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल व ठेवी १५ कोटींच्या ठेवीकडे वाटचाल, संस्थेचे एकूण कर्जवाटप ८ कोटी ३५ लाख रुपये असून, अत्यंत शिस्तबद्ध वसुली नियोजनामुळे संस्थेची थकबाकी अवघी १.८७% आणि ढोबळ एनपीए (NPA) २.०७% इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे संस्थेचा निव्वळ एनपीए (Net NPA) ०% (शून्य टक्के) असून, संस्थेने आपले उत्कृष्ट 'अ' वर्ग ऑडीट रेटिंग कायम राखले आहे.

डिजिटल सेवा आणि कार्यक्षेत्र विस्तार

संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांचे अत्याधुनिक संगणकीकरण व नूतनीकरण करण्यात आले आहे. संस्थेमार्फत सभासद व ग्राहकांना:

  • RTGS / NEFT सुविधा

  • पिग्मी मोबाईल ॲप

  • एसएमएस (SMS) बँकिंग

  • कर्जदारांसाठी विमा संरक्षण सुविधा

यांसारख्या तत्पर सेवा पुरविल्या जात आहेत.

कोडोली व परिसर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने, संस्थेचा विस्तार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा या तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

गुणवंतांचा सत्कार व मान्यवरांची उपस्थिती

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या औचित्याने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या पतसंस्थेच्या सभासदांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी व्यापारी असोसिएशनचे डॉ. प्रशांत जमने यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने श्री. बाबा पाटील यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले, तर श्री. जयदीप पाटील यांनी आभार मानले.

या सभेस चेअरमन राहुल प्र. पाटील, व्हाईस चेअरमन अजित धोडीराम पाटील, संचालक मोहन ज. साखरपे, प्रकाश तु. हराळे, शिवाजी स. पाटील, पार्थ ज. डोईफोडे, विपुल ला. पाटील, बाळासो स. माने, संतोष शि. मुदगल, जयदीप प्र. पाटील, जयदीप पा. पाटील, मॅनेजर सर्जेराव हि. साळोखे यांच्यासह सर्व शाखाधिकारी, कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news