श्री बीरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे पुण्यात पहिले प्रादेशिक कार्यालय सुरू

माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व सौ. शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य विस्तार; एक्सम्बा मुख्य कार्यालयाचा ताण होणार कमी
Shri Beereshwar Cooperative Credit Society Ltd
श्री बीरेश्वर सोसायटीच्या नव्या प्रादेशिक कार्यालयाचे पुण्यात थाटात उद्घाटन
Published on

पुणे: दक्षिण भारतातील अग्रगण्य आणि बहुराज्यीय सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 'श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., एक्सम्बा (मल्टी-स्टेट)'ने महाराष्ट्रात आपल्या विस्ताराचा नवा टप्पा गाठला आहे. संस्थेच्या प्रशासकीय व व्यावसायिक कामकाजाला अधिक गती देण्यासाठी पुण्यामध्ये पहिल्या प्रादेशिक कार्यालयाचे (Regional Office) भव्य उद्घाटन करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक, बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष व एनसीयूआय (नवी दिल्ली) चे संचालक माजी खासदार श्री अण्णासाहेब एस. जोल्ले आणि सह-संस्थापक, कर्नाटकातील माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ. शशिकला अ. जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे.

उद्घाटन सोहळा व प्रमुख उपस्थिती

५ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यात सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य महामंत्री श्री विवेक जुगडे यांच्या हस्ते प्रादेशिक कार्यालयाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री आप्पासाहेब शिवराम जोल्ले, संचालक श्री दत्तात्रय पाटील, श्री भालचंद्र कुलकर्णी, श्री श्रीकांत पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक व सल्लागार श्री शिरीष देशपांडे, उपमहाव्यवस्थापक श्री आर. जी. कुंभार, सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. योगिनी वाय. पोकळे यांच्यासह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात 'श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या पहिल्या प्रादेशिक कार्यालयाचा भव्य शुभारंभ
पुण्यात 'श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या पहिल्या प्रादेशिक कार्यालयाचा भव्य शुभारंभश्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी

प्रादेशिक कार्यालयाची उद्दिष्टे

  • प्रशासकीय विकेंद्रीकरण: एक्सम्बा येथील मुख्य कार्यालयावरील प्रशासकीय ताण कमी करणे.

  • कामात गतिशीलता: महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील शाखांच्या कामकाजाला मार्गदर्शन, सहकार्य आणि गती देणे.

  • पारदर्शकता व सुशासन: सेवांचा दर्जा सुधारून सुशासनाला (Governance) अधिक बळकटी देणे.

  • त्वरित ग्राहक सेवा: सभासदांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद आणि सुलभ करणे.

श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सध्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमध्ये २३३ शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ९,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यवसायाचा टप्पा ओलांडला असून, ४.६० लाखांहून अधिक सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. पुण्यातील या नव्या प्रादेशिक कार्यालयामुळे महाराष्ट्र व गोव्यातील व्यवसाय वृद्धीला मोठी मदत होणार आहे.

Banco News
www.banco.news