
मुंबई येथील शिवकृपा सहकारी पतसंस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी मुंबईतील ऐरोली येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा माधवी हॉल येथे उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी, सदस्यांच्या शेअर ठेवींवर १०% लाभांश जाहीर केला.
बैठकीची सुरुवात गणेश पूजन आणि प्रार्थनेने झाली. सहकार्य आणि अध्यात्माचा सोहळा म्हणून साजरा केला जाणारा शिवकृपा सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा हा सभासद, ग्राहकांच्या चार दशकांहून अधिक काळच्या विश्वासाचा आधार आहे. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या सोसायटीचे मुख्य कार्यालय, २ प्रादेशिक कार्यालये, १० विभाग आणि १०२ शाखा आहेत. येथून ९७७ कर्मचारी आणि १,०२० ठेव संकलन एजंटना रोजगार प्रदान केले जातात.
ऑगस्ट २०२५ पर्यंत, सोसायटीने ३,००८ कोटी रुपयांच्या ठेवी आणि २,२९८ कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम मिळवली, ज्यामुळे तिचा एकूण व्यवसाय ५,३०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शिवकृपा पतसंस्थेने आजअखेर १९ प्रतिष्ठित पुरस्कार मिळवलेले आहेत आणि प्रभावी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत आलेली आहे.
सदस्य आणि ग्राहकांना ठेवी आणि कर्ज योजनांना साथ देण्यासाठी प्रोत्साहित करुन पतसंस्थेचे मार्च २०२६ पर्यंत व्यवसायात ६,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट आहे. सभेस सदस्य व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.