शिवाजीराव पाटील पतसंस्थेकडून सभासदांना १४% लाभांश जाहीर!

२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; २५ व्या वर्षापर्यंत १०० कोटींच्या ठेवींचे लक्ष्य
Shivajirao Patil Pat Sanstha Ashta AGM 2026
आष्टा : शिवाजीराव पाटील पतसंस्थेच्या सभेत बोलताना झुंझारराव पाटील. यावेळी उपस्थित झुंझारराव शिंदे, वैभव शिंदे, विशाल शिंदे व अन्य.
Published on: 

आष्टा : स्थानिक शिवाजीराव पाटील (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. संस्थेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा सभासदांना १४ टक्के लाभांश (Dividend) देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संस्थेचे संस्थापक व आष्टा शहर विकास आघाडीचे गटनेते झुंझारराव पाटील यांनी केली.

पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्ष वैभव शिंदे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. संस्था आपल्या २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेपर्यंत १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा निश्चितपणे पार करेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुभाष पाटील यांची सल्लागार मंडळ अध्यक्षपदी निवड

याच वार्षिक सभेत पतसंस्थेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुभाष पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा फायदा पतसंस्थेच्या भावी विस्तारासाठी होईल, असा सूर यावेळी उमटला.

प्रमुख उपस्थिती व आभार

या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष विशाल शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, तानाजीराव सूर्यवंशी, धैर्यशील शिंदे, राजू पाटील, संदीप तांबवेकर, सुभाष देसाई, झीनत आतार आणि भूपाल खोत.

सभेच्या सुरुवातीला सुनील पाटील यांनी उपस्थितांचे शब्दसुमानांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचा सांगता समारोप करताना पतसंस्थेचे उपाध्यक्ष मारुतीराव सावंत यांनी उपस्थितांचे आणि सभासदांचे आभार मानले.

Banco News
www.banco.news