
मुंबईतील अग्रगण्य सहकारी पतसंस्था- शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त ठेववृद्धी योजनेचा शुभारंभ करत संस्थेत नवीन पर्वाची सुरुवात केली. संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष पवार साहेब, शिवकृपा पतसंस्थेचे वंजारी साहेब, सर्वोदय बँकेचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्रीताई पांचाळ, सहकारातील सहकारी मुबारक खान,ॲड. संतान भारगमाजी, एमडी श्री. पितळे,आणि अनेक सहकारी कार्यकर्ते यांच्यासह राज्यभरातील सहकारी चळवळीतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे म्हणाले की, आम्ही १९८४ साली स्थापन केलेली ही संस्था आजही ठामपणे उभी आहे. संस्थेने आजच्या घडीला एक कोटी रुपयांहून अधिक ठेवी जमा करून आर्थिक पाया भक्कम केलेला आहे. संस्थेने सर्व नियामक निकष पूर्ण केले आहेत,असे सांगून आर्थिक स्थितीचा सशक्त आलेख सादर केला.
* थकबाकी : ४.५५% (मर्यादा – ५%)
* ग्रॉस एनपीए : ९.१०% (मर्यादा – १०%)
* नेट एनपीए : ०% (मर्यादा – ५%)
* सीआरआर : ५७% (मर्यादा – ९%)
* राखीव निधी, गुंतवणूक, भाग भांडवल यांचे प्रमाण सुद्धा वटमानानुसार अधिक आहे.
याशिवाय, ३१ मार्च २०२६ पर्यंत १० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे आणि उपविधीनुसार ठेव मर्यादा पाळूनच उद्दिष्ट सध्या केले जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भाषणात नलावडे साहेबांनी सहकारातील पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “पतसंस्था छोटी असली तरी ती नीटनेटकी असावी, नियमांनुसार चालवावी. आपले वजन समजूनच काम करावे.” त्यांनी नव्या कार्यकारिणीची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराजक्ता काटकर यांचे यावेळी विशेष कौतुक केले.
महिलांना प्राधान्य, युवा कार्यकर्त्यांना संधी
कार्यक्रमात महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था व नव्या पिढीला संधी देण्यावर भर दिला गेला. शिवाई पतसंस्थेने सामाजिक समावेशासह आर्थिक विकासाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
संस्थेच्या विशेष ठळक बाबी:
* ठेववृद्धी योजनेचा शुभारंभ
* सर्व नियामक निकषांचे पालन
* तीन तासांत सोने तारण कर्ज सुविधा
* उच्च व्याजदराने ठेवी – ८ ते ९% पर्यंत
* मुक्त सदस्य नोंदणी – ओपन मेंबरशिप
शेवटी, “सहकाराची खरी ताकद लोकांचा विश्वास आहे, आणि लोकशाहीमध्ये गुणवत्तेला अजूनही किंमत आहे,” असे ठाम शब्दात सांगत नलावडे साहेबांनी कार्यक्रमाची सांगता केली.