
कोतोली स्व.आमदार संजयसिंह गायकवाड पतसंस्थेची सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पडली. यावेळी सोपान पाटील म्हणाले, "संस्थेचे संस्थापक कै. दादासाहेब चौगुले यांनी विश्वासाने लावलेल्या रोपट्याचे संवर्धन करून सभासदांना न्याय मिळवून देण्याचे कार्य चेअरमन डॉ. स्नेहदीप चौगुले यांनी केलेले आहे."
मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम चौगुले यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी संचालक योगिनी गंधवाले, बळवंत पोवार, सुनिता चौगुले, मधुकर चौगुले, महादेव चौगुले, सुमन चौगुले व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.